साहित्यः
कृतीः
- १ वाटी पुदिन्याची पाने
- २-३ हिरव्या मिरच्या
- पाव वाटी ओले किंवा सुके खोबरे
- पाव वाटी कोथिंबीर
- १०-१२ लसूण पाकळ्या
- १-२ चमचे दाण्याचा कूट
- चवीनूसार मीठ
- चवीसाठी साखर आणि लिंबू (हवे असल्यास)
कृतीः
- दाण्याचा कूट सोडून सर्व साहित्य वाटून घ्यावे.
- यात कूट, साखर आणि लिंबू टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
- ही चटणी जेवताना वाढता येते अथवा मधल्या वेळेच्या पदार्थांबरोबरही (ढोकळा, दाली इ.) देता येईल.