Sucheta's Kitchen
Write me on
  • Home
  • Indian
    • Breakfast
    • Vegetables\Subzis
    • Flat Breads
    • Food for Fasting
    • Festival Special
    • One-Dish Meal
    • Chutney & Pickles
    • Non-Veg
    • South Indian
    • Fast Food
    • Postpartum
  • Bakery
    • Cookies and Biscuits
    • Cupcakes and Muffins
    • Cakes and Pastry
    • Breads
    • Cake Decoration
  • Desserts
  • Italian
  • Chinese
  • Baby's Special
  • Contact Me

उकडीचे मोदक

27/8/2014

0 Comments

 
Read in English
गणपती बप्पा मोरया!!! सर्व गणेशभक्तांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

गणपती बप्पाच्या आवडत्या मोदकांची पाक
कृती खास आपणां सर्वांसाठी!!!


साहित्यः


सारणासाठी:

  • १ कप खोबरयाचा कीस
  • १/२ कप गूळ
  • १ टीस्पून वेलची पूड
  • १/२ टीस्पून जायफळ पूड
  • १ टेबलस्पून मणुके
  • १ टेबलस्पून साजूक तूप

पारीसाठी:
  • १ कप तांदूळाची पिठी
  • १ टीस्पून साजूक तूप
  • १/२-१ कप पाणी
  • मीठ चवीनुसार

कृतीः

सारणाची:
  1. कढई / पॅन मध्ये तूप गरम करून त्यात किसलेला अथवा फोडून बारीक केलेला गूळ आणि खोबरयाचा कीस टाकून मिश्रण लालसर होइपर्यंत परतावे.
  2. यात मणुके, वेलची व जायफळ पूड टाकून मिश्रण नीट एकत्र करून बाजूला ठेवावे.

पारीची:
  1. पाणी कडकडीत गरम करून घ्यावे.
  2. तांदळाच्या पिठीत तूप, मीठ टाकून त्यात गरम पाणी हळूहळू टाकावे आणि चमच्याने हलवत रहावे.
  3. साधारण सगळ्या पिठाच्या गाठी झाल्या की कणकेपरमाणे हलक्या हाताने मळून घ्यावे. कणीक एकसंध दिसावयास हवी.

मोदकाची:
  1. पारीसाठी कणकेचा लिंबाएवढा गोळा घेऊन हाताने त्याची पारी करावी अथवा दोन प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवून लाटावी.
  2. या पारीमध्ये सारण भरून मोदक बनवावेत.
  3. सगळे मोदक बनवून झाले की १०-१५ मिनिटे उकडून घ्यावेत.


टीप:
  1. खोबरयाचे छोटे-छोटे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतले तरी चालेल.
  2. कणीक मळून झाल्यावर शक्य असल्यास थोडावेळ झाकून ठेवावी. मोदक बनवतानाही कणीक झाकून ठेवावी.
  3. मोदक उकडण्यासाठी इडलीपात्राचा वापर करता येईल.अथवा मोदक एका चाळणीत ठेऊन ती चाळणी पाणी उकळत असलेल्या पातेल्यात झाकून ठेवावी. उकळत असलेले पाणी खालून मोदकांना लागणार नाही याची काळजी घ्यावी.


0 Comments



Leave a Reply.

Recent Posts
Bharwan Baingan
Bharali Wangi
Puri-Bhaji for Fasting
Puri-Bhaji for Fasting
kadhi
Kadhi
Sweet Buns
Sweet Fruit Buns
Rasogulla
Rasagulla\ Rasogulla

Proudly powered by Weebly